UPCOMING EVENTS


Upcoming Events (Lectures on):

  • HISTORY WEEK FEBRUARY 2012


  • History Week 2012
  •   lecturers:30th Jan-श्री.कुमार केतकर_Pandit Neharu, 31st Jan श्री.सुरेश द्वादशीवार_Mahatma Gandhi,
  • 1st Feb श्री.राजू परुळेकर_Dr. Babasaheb Ambedkar,
  • 2nd Feb_श्री.अजित अभ्यंकर_Marx , 3rd Feb_श्री.विश्वंभर चौधरी _RSS

Friday, February 17, 2012

History Club presents...

19 Feb 2012 : A Numismatics Workshop by Shri.Vijay Dikshit
Limited Seats.. No Fees/Charges are required... Registration is necessary...
Timing: 9.00am -11.00am.

AND
Know story of first travel industry in India,first Mill in India,know how TATAs,BIRLAS,TOI,BAJAJs..a
ll have evolved...
Lecture by Shri.B.H.Shrikanth
on the topic of..
" Industrial History Of India & Engg Developments In The World ...Language:English"

Friday, October 21, 2011

CoEP history Club has been at the helm in discussing variety of subjects.
this year 3 of the students gave the lectures on three different topics।We are presenting to you the ppts made by them for better understanding.I hope they will be of help to you.
मध्यमंताराचा इतिहास

इस्लाम

history of space technology


Presentations made by our students in the past are also available on following link.

History Club pptLink

Friday, February 25, 2011

धर्म सावरकरांचा आणि गांधीजींचा -भाग 1

(श्री. वि. ग. कानिटकर यांनी "धर्म सावरकरांचा आणि गांधीजींचा" या पुस्तकात दोघांच्या मतांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. ते मी इथ साभार मांडतो..)
धर्मांची समानता -
स्वा. सावरकर, जात्युच्छेदक निबंध केसरी: १७ जानेवारी 1936

ज्याला जो धर्म प्रिय तो त्याने आचरावा ,ज्यास जो धर्मग्रंथ ईश्वरीय व पवित्र वाटेल त्याने तो मानावा. इतरांनीही तो तो यथाप्रमाण आचरावा . ही सारी शिष्टाचाराची सुभाषिते तंतोतंत पाळण्यास किमान हिंदू तरी केव्हाही अवमान करणार नाही.

ये अपि अन्य देवाता यजन्ते श्रद्धयान्विता: |
ते अपि मामेति कौन्तेय याजान्त्याविधीपूर्वाकाम ||
श्रध्दापूर्वक जे कोणी ,यजिती अन्य दैवते| यजिती तेहि मातेची परी मार्ग सोडूनी|| (गीताई अ.३०९ श्लोक २३), ही शिकवण हिंदूंच्या अत्यंत थोर अशा गीतेसारख्या ग्रंथातच दिली आहे.

परंतु जेव्हा कोणी मुस्लीम व अन्याधार्मीय आपण होऊनच धर्माच्या तुलनेचा प्रश्न काढतील. इतकेच नव्हे तर हिंदू धर्म विषमतेने ओतप्रोत भरलेला असून आमचा मुसलमान धर्म हा माणसामाणसात मानल्या जाणार्या विषमतेपासून
अलिप्त आहे , आमच्या धर्मात सारी माणसे समान मानली जातात, ती एकाच देवाची लेकरे आहेत, अशी प्रकट आव्हाने देऊ लागले तर अशा वेळी त्या आक्षेपांना न खोडता त्या आव्हानास न स्वीकारता "रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति|" अस म्हणून स्वस्थ बसणे म्हणजे शिष्टाचाराचा भंग करणेच होय..निव्वळ भेकडपणा होय.

मुस्लिमांनी धर्मात तत्वत: किंवा व्यवहारात सर्व माणसे समान लेखालेली आहेत. त्यात धार्मिक उच्चनीचता व जन्मजात जातीश्रेष्ठतेला मु
ळी वाव नाही ही एक निव्वळ थाप आहे. मुसलमानी धर्मातत्वात नि धर्मव्यवहारात
नुसती विषमता आहे , इतकेच नव्हे तर ती काही प्रसंगी आततायी व असहिष्णू आहे.

मुस्लीम धर्माच्या मूळप्रतीज्ञेमाध्येच जगाचे एकदम दोन तुकडे केलेले आहेत. महम्मदना शेवटचा पूर्ण व खराखुरा पैगंबर मानणारे तेव्हढे मुस्लीम आणि बाकीचे मनुष्यजात काफर! जो मुसलमान तोच स्वर्गात जाणार , काफर तो चिरंतन नरकात ! म्हणजे महाम्माद्ना पैगम्बर मानणे हा माणुसकीचा पहिला गुण !

म्हणजे बुद्ध, कान्फ्युशियास, चीनी - जपानी संत ,ज्ञानेश्वर, तुकाराम ,ख्रिस्त ,वसिष्ठ , व्यास, वाल्मिकी, रोहिदास, नानक यांन्ने महम्मद हाच काय तो शेवटचा पूर्ण व खराखुरा पैगंबर मानला नाही या कारणास्तव ते नरकात पिचत आहेत!

निचातील नीच असला तरी महम्मद साहेबांना मानणारा तो मुसलमान , हा साधुतील साधू काफराहून श्रेष्ठ ! असे कुरानाच्या पानोपानी
उद्घोषणा करणारा ,हा धर्म सारी माणसे समान मानणारा धर्म आहे की माणसामाणसात भयंकर आणि असमर्थनीय अशी विषमता फैलावानारा धर्म आहे ?

ही विषमता जितकी कठोर , त्याहूनही मुसलमान राजवटीच्या अनुशासानातील त्याच्या स्म्रुतीनिर्बंधाग्रंथातील विषमता शतपट क्रूर आहे. अनेक मुस्लीम बादशाह आणि मौलावीन्नी जे बाटले नाहीत त्यांच्या कत्तली उडवल्या, जिझिया कर बसवलं, ...महम्मद गझनी ,औरंगजेब यांच्या राजवटी मानवी समतेच्या आणि परम सहिष्णुतेच्या अर्क होत्या की काय ? समता तर सोडाच पण मुस्लिमेतर माणसांना माणसासारखे जगण्याची चोरी करणाऱ्या भयंकर विषमतेच्या आणि आततायी असहिष्णुतेच्या पायी सांडलेल्या हिंदू रक्ताने मुस्लीम राजवतींचे हिंदी इतिहासातले पण अन पण भिजून ओलेचिंब झालेले आहे।

आजही मौलवी महम्मद अली,शौकत आली सारखे अगदी धुतलेले मुस्लीम प्रचाराकाही धड धाडीत म्हणतात की " गांधी कितीही सच्छील असला तो जोवर काफर आहे, तोवर नीचांतील नीच मुसल्मानही मला त्याच्या पेक्षा श्रेष्टच वाटणार. "

(पुढील क्रमश:)


Submitted by: Harshad Samant

Thursday, February 24, 2011

धर्मनिरपेक्षता आणि धर्मांधता


एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात माझा जन्म झाला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मी आधुनिक शिक्षण घेतले. हिंदूंमधील सुधारणावादी अशा आर्य समाजाशी माझ्या कुटुंबीयांचा- विशेषतः माझ्या दोन्ही आजोबांचा संबंध होता. माझ्या वडलांनी मात्र वेगळा मार्ग निवडला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांना एक गुरू भेटले. या गुरूंनी त्यांना प्रेरणा दिली आणि उपासनेचा वसा दिला. या गुरूंचे नाव होते राधास्वामी. ते रसाळ प्रवचन करायचे आणि कबीर, नानक, मीराबाई, बुलेश शहा आणि भक्ती व सूफी परंपरेतील अनेक संतांची वचने ते सांगायचे. माझी आजी दर सोमवारी आणि बुधवारी शीख समाजाच्या गुरुद्वारात जायची; मंगळवारी आणि गुरुवारी मंदिरांत जायची, तर शनिवारी-रविवारी ती मुस्लिम पीरांकडे जायची. शिवाय अधूनमधून ती आर्य समाजाच्या कार्यक्रमांना; तसेच बारशांपासून मर्तिकेपर्यंतच्या सर्व घटनांना उपस्थित राहायची. तिच्या खोलीमध्ये अनेक देवतांच्या- विशेषतः राम आणि कृष्ण यांच्या प्रतिमा असायच्या. ""जगात अनेक देवता आहेत; परंतु देव मात्र एकच आहे,'' असे ती म्हणत असे. माझे आजोबा आजीची थट्टा करायचे, तर काका म्हणायचे, की कोणता तरी देव तिचे ऐकत असेल!
अशा या सर्वसमावेशक आणि संमिश्र वातावरणात मी वाढलो. त्यामुळे एक प्रकारचा उदार दृष्टिकोन विकसित झाला. मात्रआता स्वतःला एक उदारमतवादी हिंदू असे म्हणवून घेताना मला काहीसे अस्वस्थ वाटते. असे का व्हावे? मला वाटते, कीहिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्षतावादी (सेक्युलरिस्ट) या दोघांच्या मध्ये माझी कुचंबणा होत आहे. काहीतरी नक्कीच चुकतआहे. हिंदू राष्ट्रवादी हिंदुत्वाला राजकीय चौकट देत आहेत, तर धर्मनिरपेक्षतावादी कोणत्याही श्रद्धेकडे तुच्छतेने पाहतआहेत. माझ्या हिंदू पार्श्वभूमीला मी बिलगून असणे धर्मनिरपेक्षतावाद्यांना म्हणूनच अयोग्य वाटते. दुसरीकडे या देशातलामोठा तरुणवर्ग आपल्या प्राचीन वारशाबद्दल एक तर अनभिज्ञ आहे किंवा त्याबद्दल तो काही बोलू इच्छित नाही.
थट्टेचा विषय?
काही वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीला म्हटले, की मला महाभारत पूर्णपणे वाचायचे आहे; समजून घ्यायचे आहे. पाश्चिमात्यपुराणकथा मी वाचल्या आहेत; परंतु भारतीय पुराणकथा वाचले नसल्याचे मी तिला सांगितले. तिने माझ्याकडे संशयानेपाहिले. आयुष्याच्या मधल्या टप्प्यावरच्या कोड्यात मी अडकलो असेन, असे तिला वाटले. मग ती माझी थट्टा करू लागली. नंतर बराच काळ विविध समारंभांत, पार्ट्यांत माझ्याबद्दल बोलताना थट्टेचा सूर निघू लागला. लोक म्हणायचे, ""मग काय, तुम्हाला म्हणे पुराणकथा वाचायच्या आहेत?'' बाजारात नवीन पुस्तके नाहीत काय, असा प्रश्नही काहींनी विचारला. एकामाजी सनदी अधिकाऱ्याने मला विचारले, ""तुम्ही या पुराणकथा वाचून काय करणार आहात?'' त्यानंतर माझ्या उत्तराकडेफारसे लक्ष न देता ते त्यांच्या नव्या मोबाईल फोनमधील फीचर्स पाहत राहिले. तरीही मी म्हणालो, की मी महाभारताचाअभ्यास करतो आहे. त्यावर ते म्हणाले, ""व्वा! पण तुम्हाला हिंदुत्वाची तर बाधा झालेली नाही ना?''
त्यांची ही प्रतिक्रिया कदाचित सहज असेल; त्यांच्या मनात काहीही नसेल. मात्र त्यामुळे मी निराश झालो; अस्वस्थ झालो. पुराणकथा वाचणे, धार्मिक ग्रंथ वाचणे ही कट्टरतेची कृती आहे, असे तर काही "धर्मनिरपेक्षतावाद्यांना' वाटत नाही ना, असाप्रश्न मला पडला. तसे असेल तर धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या असहिष्णुतेची मला भीती वाटू लागली. या प्रतिक्रियेने मलाचेन्नईतील मला माहीत असलेल्या एका महिलेची गोष्ट आठवली. या महिलांची वेशभूषा पाश्चिमात्य आहे. घराजवळच्याशंकराच्या मंदिरात त्या अधूनमधून जात. मात्र त्यांच्या काही धर्मनिरपेक्षतावादी मित्रांनी त्यांच्या या "धार्मिक' वृत्तीची थट्टासुरू केली. शेवटी आपल्यावर हिंदुत्वाचा शिक्का बसेल की काय, या भीतीने या महिलेने मंदिरात जाण्याचेच बंद केले होते.
हे खरे आहे, की आज धार्मिक मूलतत्त्ववाद जगभर वाढतो आहे. मात्र त्यामुळे धार्मिक आणि धर्मांध यांच्यात फरक करणेचबंद झाले आहे. एखादी व्यक्ती धार्मिक असू शकते. आपल्या श्रद्धा ती जोपासत असते. मात्र अशी व्यक्तीही धार्मिकमूलतत्त्ववादीच आहे, अशी समजूत धर्मनिरपेक्षतावादी करून घेत आहेत. त्यामुळे असे होत आहे, की उदारमतवादी हिंदूहीआपला धार्मिकपणा लपवू पाहत आहेत. आपल्या धार्मिकतेचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तर लावला जाणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटते आहे. अन्य देशांतील उदारमतवादी ख्रिश्चन आणि उदारमतवादी मुस्लिम यांनाही अशाच प्रकारचीभीती वाटते आहे.
भारतात असे का होत असावे? याची काही कारणे संभवतात. एक म्हणजे एके काळी धर्मनिरपेक्षतावादाची बाजू मांडणारी, तोउचलून धरणारी बहुतेक मंडळी मार्क्सवादी होती. या मंडळींचा देवावर विश्वास नसतो; किंबहुना ते देवाचा द्वेष करतात. त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद धर्माच्या दुसऱ्या बाजूकडेच- म्हणजे अंधश्रद्धा, कट्टरता, धर्मांधता याकडेच पाहत असतो. परंतुधर्माची दुसरी बाजूही आहे. धर्माच्या आधारेच अनेक जण जीवन व्यतीत करीत असतात, दैनंदिन प्रश्नांची सोडवणूककरण्याचा प्रयत्न करीत असतात. धर्म हा त्यांच्यासाठी आश्रयस्थान असतो. याकडे दुर्लक्ष करीत धर्मनिरपेक्षतावादी आपलेमुद्दे मांडत असतात. मात्र त्यांची भाषा ही येथील सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडची असते. त्यामुळे धर्मांधतेलारोखण्याची त्यांची धडपडही अपुरी पडते. धार्मिक विद्वेषातून होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध करणे, एवढेच त्यांच्या हातातराहते. असा हिंसाचार त्यांना रोखता येत नाही. महात्मा गांधींनी मात्र तो रोखून दाखवला होता. स्वातंत्र्याच्या सुमारासबंगालमध्ये गांधीजींनी ही किमया करून दाखविली.
दुसरे कारण अज्ञानाचे आहे. आपल्याकडील मुले प्राचीन वाङ्मय, पुराणकथा यांचे वाचन फारसे करीत नाहीत. पाश्चिमात्यदेशांतील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत प्राचीन वाङ्मयाचा, साहित्याचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, त्याकडेसमीक्षात्मक दृष्टिकोनातून पाहतात. आपल्याकडे हे व्यापक प्रमाणावर होत नाही. मुलांना पुराणकथा कळतात त्या आजीनेसांगितलेल्या गोष्टींमधून, "अमर चित्रकथा'सारख्या पुस्तकांतून किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून. इटालियनविद्यार्थी दान्तेच्या "डिव्हाईन कॉमेडी'चा अभ्यास करतात, इंग्लिश विद्यार्थी मिल्टन वाचतात आणि ग्रीक मुले इलियाडचाअभ्यासतात. असे असताना "महाभारता'च्या अभ्यासाबाबत "धर्मनिरपेक्षता'वादी द्विधा मनःस्थितीत का असतात? एक खरेआहे, की महाभारतात अनेक देवता आहेत आणि कृष्णासारखी व्यक्तिरेखा आहे- जी एकाच वेळी तत्त्वज्ञान सांगते, चतुराईकरते, शिष्टाई करते आणि कारस्थानेही करते. दान्ते, मिल्टन आणि होमर यांच्या वाङ्मयातही देव-देवता आहेतच ना?
खऱ्या धर्मनिरपेक्षतेसाठी..
शाळांत महाभारत शिकविण्याबाबत मला पडलेला हा पेच कदाचित गांधीजी समजू शकले असते. या महाग्रंथाच्याभारतीयांच्या जीवनात असलेल्या स्थानाची कल्पना त्यांना होती. महाभारताचे एक भाष्यकार व्ही. एस. सुखटणकर यांनीम्हटले आहे, ""महाभारत हा आपल्या सामूहिक अंतर्मनाचा आशय आहे.. त्यामुळे आपण त्याचा दोन्ही हातांनी स्वीकारकरायला हवा आणि समतोलपणे तो समजून घ्यायला हवा. मग लक्षात येईल, की महाभारत हा वर्तमानकाळापर्यंत लांबलेलाभूतकाळ आहे. तो वर्तमानकाळ म्हणजे आपण स्वतःच.'' गेली सहा वर्षे मी महाभारत वाचतोय आणि त्यातून मला आनंदमिळतोय. रोज तो मला नव्याने भेटतोय. आपल्या संस्कृतीची खोलवर गेलेली ही मुळे आपल्या नव्या पिढीला कळलीपाहिजेत. ती जर त्यांनी माहीत करून घेतली नाही, तर या मुळांविनाच वाढतील- आणि मग त्यांना या संस्कृतिवृक्षाची फळेहीचाखता येणार नाहीत.
भारतात धर्मनिरपेक्षतावादाची बीजे रोवण्याचे प्रयत्न आपण करतो आहोत. पण या प्रयत्नांत धर्मांधता आणि धर्मनिरपेक्षतायांच्यात देशाचे विभाजन करून चालणार नाही. तसे करणे खूप सोपे ठरेल. सर्वसामान्य भारतीय हे सभ्य आणि मर्यादाशीलआहेत. सर्व धर्मांच्या, श्रद्धांच्या आणि नास्तिकतेच्याही प्रती सहिष्णुता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांच्या धार्मिकतेचालाभ घेत हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे रूपांतर आपल्या मतपेढीत करू नये. धर्मनिरपेक्षतावाद्यांनीही धार्मिकतेचा आदर करायलाहवा, तेव्हाच धर्मनिरपेक्ष समाजाची स्थापना होईल.
- ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍‍ ‍ ‌‍ ‌ ‌ गुरुचरण दास

शिवरायाचे कैसे जेवणे?

Chhatrapati Shree Shivaji Maharaj

छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्या गोष्टी हा अस्मादिकांचा तसा अगदी प्रागैतिहासिक काळापासोनचा अनन्य विसावा आहे. बाजीप्रभू , मुरारबाजी, तानाजी, संभाजी कावजी, बहिर्जी नाईक, या वीरांच्या प्रभावळीत तानाजी हा आमच्या गल्लीतील एका काकांचा ऑल टाईम फेवरीट होता.ते आम्हाला अनेक गोष्टी सांगत. पण तानाजीच्या शौर्याच्या गोष्टी तर ऐकून ऐकून पाठ झाल्या होत्या. मग काय करावे? ते तानाजीच्या भोजनचर्येच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी सांगत असत. ती वर्णने असत भीमाची, परंतु तानाजीच्या नावावर खपवीत. त्यामुळे “तानाजी हाच महाभारतातील भीम” ऐसा एक प्रबंध रेडी करावा असा मानस होता, परंतु गाईड मिळेना, त्यामुळे ते राहिले आणि महाराष्ट्र अजून एका पी. एच. डी. प्रबंधाला मुकला. पण त्या गोष्टी मात्र कायमच्या लक्षात राहिल्या. मग त्यात १०० किमी रपेट करून आल्यावर तानाजीने १०० भाकर्यांचा ऑन द स्पॉट कसा फडशा उडविला, रोजच्या न्याहारीला वीसेक ऑम्लेट्स कशी बनविली जात, रायबाने एकदा “आता बास” म्हटल्यावर तानाजीने त्याला अजून १० भाकर्या कशा खायला लावल्या, शेतावर न्याहारीला बसले असताना लोणच्याची इच्छा झाल्यावर माईनमुळाचे झाडच्या झाड उपटून त्याने कसे “फार्म-फ्रेश” लोणचे खाल्ले, अशा आणि अजून अनेक कथा-उपकथा होत्या. शेवटी बालसुलभ शंका म्हणून मी विचारलेच- ” जर इतक्या भाकर्या आणि भात रोज शिजत होता, तर मोलकरणी किती असतील? त्यासुद्धा फक्त भाकर्या बडवायला?” त्यालाही उत्तर तयार होतेच- जास्ती नाही, पण ज्या होत्या त्यांना स्पेशल आहार, उदा. थंडाई वगैरे दिली जात असे- झीज भरून काढून अंगात दम राहावा म्हणून!

हे खरे की खोटे, याची शहानिशा काही आम्ही तेव्हा केली नाही. पण त्या भानगडीत शिवकालीन खाद्यसंस्कृतीबद्दल कायमचे कुतूहल मनात घर करून बसले. खरंच काय बरे खात असतील हे लोक? हे मावळे आणि महाराज आपल्यासारखे गव्हाच्या चपात्या खात असतील की भाकर्या? भाज्या कोणत्या खात असतील? यापैकी काही प्रश्नांची उत्तरे सोपी आहेत, तर काही माहिती कालौघात गडप झालीये. पण काहीसा धावता आढावा तरी आपण नक्कीच घेऊ शकतो.

सुरुवातीचा मुद्दा म्हणजे १७व्या शतकातील महाराष्ट्रात गहू कितीसा पिकत होता? आत्ता घरोघरी गव्हाच्या चपात्या आपण खातो खर्या, परंतु आत्ताचा गहू म्हणजे मुख्यत: हरितक्रांतीनंतरच्या पंजाबची देणगी आहे. तेव्हा गहू अगदीच पिकत नसे असे नाही, परंतु जनसामान्य सर्रास खातील इतका तरी नक्कीच पिकत नव्हता. आणि बटाटा? मुळात हा प्रकार म्हणजे पोर्तुगीज लोकांची जगाला देणगी आहे. दक्षिण अमेरिकेतून त्यांनी बटाटा आणला आणि जगाला दिला. त्यामुळे कमीत कमी इ.स. १६०० पर्यंत तरी भारतात बटाट्याचे उत्पादन घेतले जात नसे. पहिल्यांदा सुरत येथे बटाट्याचे पीक घेतले गेले आणि तिथून तो सगळीकडे फोफावला. मग मुख्य धान्ये कोणती? ज्वारी, नाचणी , बाजरी. मावळात तरी कमीतकमी यांचीच चलती असे. आणि भात तर होताच. भाताच्या आंबे मोहर ह्या जातीचे नाव मावळातील त्या नावाच्या २ गावांवरून पडले असे मराठी व्युत्पत्ती कोश म्हणतो. पण बासमती तेव्हा कोणी फारसा वापरत नसे- तो वाण महाराष्ट्रातील नाहीच मुळी. घनसाळ, जिरेसाळ इत्यादी भाताचे प्रकार होते. आणि मका जरी १७व्या शतकात भारतात पिकत असला, तरी महाराष्ट्रात नव्हता.

ही झाली मुख्य धान्ये. डाळी कोणत्या होत्या? मसूर, तूर , मूग, चणा, उडीद, हरभरा इत्यादी. या डाळींचा उल्लेख अगदी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात देखील आढळतो. त्यात त्यांच्या विविध जाती-उपजाति आहेत, असे स्पष्ट विधान आहे. संगम तमिळ साहित्यात तूर डाळीचे काही उल्लेख आहेत. आणि पालेभाज्या म्हणाल तर अंबाडी, तांदळी, पालक इत्यादी या १७ व्या शतकातील महाराष्ट्रात होत्याच. पालकाबद्दल असे म्हटले जाते की इराण मधून अरब व्यापार्यांनी तो भारतात आणला, त्यामुळे कमीतकमी इ.स. १००० नंतर तरी भारतात पालक पिकवला जाऊ लागला हे निर्विवाद.

ही झाली निव्वळ अन्नधान्याची वर्गवारी. पण तेव्हाच्या जेवणात कोणत्या डिशेस होत्या? आत्तासारखी गल्लोगल्ली पंजाबी हॉटेल्स आणि कोल्हापुरी अस्सल मिसळ तेव्हा नसे. इतकेच काय, अगदी १९६०-७० पर्यंत पुण्याच्या शासकीय एन्जिनिअरिन्ग कॉलेजच्या होस्टेल मेस मध्ये कोकणी, देशावरची, सिंधी-पंजाबी आणि एक कॉमन नॉनव्हेज मेस होती. त्यामुळे १७ व्या शतकातील महाराष्ट्रात जेवणात बरीच विविधता होती. त्यात परत असंख्य जातींचे निकष लावले की अजून वैविध्य येते. एकच आमटी , देशावर आणि कोकणात वेगळ्या तऱ्हेने बनत असे, अजूनही बनते. आणि एकाच प्रदेशातील जाती-धर्मानुसार सुद्धा जेवणात फरक पडतो.

तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ. शिवाजीमहाराज रोजच्या जेवणात काय बरे जेवत असतील? त्यांच्या जेवणात जे जे घटक असण्याची सर्वात जास्त शक्यता होती, त्यांची यादी वर दिलेली आहे . चपाती-भाजी, भात शिवाय काही गोड-धोड पदार्थ असावेत. शिवाय नॉनव्हेज तर क्षत्रिय असल्याने ते खात असावेतच. पण त्यात देखील कोणते नॉनव्हेज? चिकन? मटन? मासे? देशावर जास्त काळ वास्तव्य असल्याने मासे हा प्रकार कधीतरी कोकण प्रांतात गेल्यावरच जास्त करून होत असावा. त्यामुळे उरले चिकन आणि मटन हे दोन पर्याय. महाराजांची जीवनशैली पहिली, तर एक गोष्ट लक्षात येते, की त्यांनी आयुष्यभर धावपळ, दगदग केली. स्वस्थता अशी फारशी लाभलीच नाही. त्यामुळे जाड्य, मांद्य आणणारे मटन सारखे नॉनव्हेज ते सर्रास खात असतील का, अशी शंका येते. त्यामुळे जास्त शक्यता वाटते ती चिकनचीच. दुर्गभ्रमणगाथेत गोनीदांनी एक उल्लेख उद्धृत केला आहे( मूळ तो कदाचित नरहर कुरुंदकरांचा असावा- स्मरण पुसट आहे), की महाराज चिकन खात असावेत. उत्तरेत गेल्यावर पुलाव, तंदुरी इत्यादी गोष्टींचा आस्वाद त्यांनी नक्कीच घेतला असेल. पण गोवळकोंड्याला त्यांनी बिर्याणी खाल्ली होती का? नसावी, कारण हैदराबादी बिर्याणी हा प्रकारच मुळात निजामाच्या काळात विकसित झाला, १८ व्या शतकात. बंगळूरला गेल्यावर इडली-डोसा, तर वेल्लोरला गेल्यावर रसम इत्यादी पदार्थ त्यांनी खाल्ले असावेत. शिवाय ते खिचडी खात असत. आता म्हणाल यात काय विशेष? विशेष आहे तो म्हणजे खिचडीचा केलेला उल्लेख. राज्याभिषेक जेव्हा झाला, तेव्हा हेन्री ऑक्झेण्डन हा इंग्रज वकील रायगडावर हजर होता.त्याने लिहून ठेवले आहे, की मराठे डाळ-तांदळात लोणी घालून खातात! त्याला तरी काय माहिती म्हणा मुगाची खिचडी! [बाकी खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मोगलाई आणि पेशवाई जास्त इंटरेस्टिंग आहेत, पण त्यांपैकी प्रत्येकाचा परामर्श घ्यायचा तर स्वतंत्र पुस्तकच हवे. असो.] आणि प्रसंगवशात काजू-पिस्ते तर नक्कीच खात असतील. पापड-सांडगे देखील रायगडावर केले जात असावेतच. पण तत्कालीन पदार्थांबद्दल एतद्देशीय साधने पहिली तर ब्राह्मणी जेवणाचे डीटेल वर्णन समर्थ रामदासांच्या एका रचनेत आहे. त्यावरून काहीसा अंदाज बांधता येतो.

[जाता जाता :"Shivaji's visit to Aurangzeb at Agra" या जदुनाथ सरकारांनी संपादित केलेल्या राजस्थानी पत्रसंग्रहात शिवाजीमहाराज दिसायला कसे होते , याचा उल्लेख आला आहे. अस्सल पत्रातील वाक्यांचे सरकारांनी इंग्रजी भाषांतर केले आहे तेच खाली देतो:
" At first sight, Shivaji's body looks lean and short, but he is wonderfully fair in complexion, and even without knowing who he is, one does feel that he is a ruler of men. His spirit and manliness are apparent from his demeanor. He wears a beard."
अजूनही बरेच वर्णन पुढे आहे, पण त्यातील मुख्य महत्वाचा भाग वर दिला आहे. वरील वर्णनावरून असे दिसून येते, की महाराज उंचेपुरे म्हणावे असे नव्हते. आणि त्यांची अंगकाठीही जराशी बारीकच होती. पण हे वर्णन आहे इ.स. १६६६ चे- महाराज तेव्हा ऐन छत्तिशीत होते आणि तो काळ सर्वात धामधुमीचा होता. पुढे १६७० नंतर जराशी स्वस्थता लाभल्यानंतर मात्र महाराजांचे वजन बर्यापैकी वाढले. याला पुरावा म्हणजे त्यांच्या राज्याभिषेकावेळी जी सुवर्णतुला झाली, तिला हजर असलेल्या एका इंग्रजाने नमूद केले आहे, की महाराजांचे वजन सुमारे ७०-८० किलो असावे.हा अंदाज अर्थात मोहोरांच्या संख्येवरून आणि एका मोहोरेच्या साधारण वजनावरून केला गेलेला आहे. असो.]

-निखिल बेल्लारीकर,

COEP HISTORY CLUB

सेक्युलारिझम – १


“आचार्य नरहर कुरुंदकर” यांच्या “जागर” या लेख संग्रहातून साभार..

मूळ लेखाचे शीर्षक: सेक्युलारिझम आणि इस्लाम

*************************************************************

“Secularism” हा इंग्रजी शब्द मी मुद्दामच भाषांतरित न करता स्वीकारलेला आहे. अधर्मी, निधर्मी, धर्मातीत या शब्दांनी तर “Secularism” या शब्दातील मूळ कल्पना स्पष्ट होताच नाही, पण इह्लोकवादी किंवा इह्लौकिक या शब्दांनीही नीटसा अर्थबोध न होता गोंधळच माजण्याचा संभव आहे. विशेषतः “Secularism” या शब्दालाही दीर्घ इतिहास असल्यामुळे व त्याही कल्पनेचा इतिहासक्रमात विकास होत आल्यामुळे तो शब्द तसाच ठेवणे इष्ट वाटते. अधर्मी, निधर्मी यांसारख्या शब्दप्रयोगांनी राज्यसंस्था स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म मानणार नाही, इतकाच बोध होतो.राज्यसंस्थेने स्वतःचा धर्म म्हणून कोणताही धर्म घोषित केला नाही, तरी समाजजीवनात धर्माचे स्थान राहणारच. हा धर्म व्यक्तीच्या मनावर आपले प्रभुत्व गाजवितच राहणार. राज्यसंस्था या धर्मप्रभावाकडे दुर्लक्ष करणार कि काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि इह्लोकवादी राज्यसंस्था असे म्हणतानाच सरकार परलोकावर श्रद्धा ठेवण्यास मनाई करणार कि काय, असेही वाटू लागते. इतर सर्व तपशीलात न जाता Secularism ची माझ्या समोरची मुख्य कल्पना “धर्म ही फक्त पारलौकिक प्रश्नांचा विचार करणारी संस्था आहे,” या एक मुद्यातून निष्पन्न होणारी आहे. जगातील एकाही धर्माला धर्माची ही व्याख्या पटणार नाही. किंबहुना, धर्माची ही सर्वात धर्मद्रोही व्याख्या आहे, यावर सर्वांचे एकमत होईल!!

कोणताही धर्म स्वतःला निव्वळ पारलौकिक मानीत नाही. किंवा खऱ्या अर्थाने पहायचे तर कोणताही धर्म अंतिमतः इहलोक आणि परलोक ही विभागणी मान्य करत नाही. भारतातील हिंदू विचारवंत धर्माचा विचार पुष्कळदा पारलौकिक, पारमार्थिक परिभाषेत विचार मांडण्याचा प्रयत्न करतात ; पण हे हिंदु धर्माने घेतलेले वर्तमानकाळातील जाहीर सभेपुरते मर्यादित असलेले सोज्वळ रूप आहे ; सत्य नव्हे. इस्लाम तर इहलोक आणि परलोक , धार्मिक जीवन आणि सामाजिक जीवन अशी विभागणी अजिबात मान्य करत नाही.प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही श्रद्धा ,चालीरीती निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यांचा आधार सुटला, तर सगळे धर्म एकदम हवेत तरंगू लागतील, – निष्प्रभ होतील. धर्म ज्यावेळी इहलोकाची कक्षा आपल्या कक्षेतून सोडून देतो, त्यावेळी एक सामाजिक सत्य म्हणून किंवा समाजघटना म्हणून धर्माचा विचार करायची गरज संपते. ज्या दिवशी धर्म केवळ पारलौकिक बाबींपुरता मर्यादित राहील तेव्हा धर्म इहालोकाविषयी काही सांगू शकणार नाही. गाय हे इहलोकातील जनावर, चे मांस खाणारे इहलोकातील काही मानव. गाय मारणे, तिचे मांस खाणे या सगळ्या क्रिया इहलोकातील. धर्माची कक्षा पारलौकिक आहे, हे जर खरे असेल, तर गाय पवित्र आहे हेहे धर्म सांगू शकत नाही!! गाय भक्ष्य कि अभक्ष आहे हेही सांगू शकणार नाही. हिंदू धर्मातील कोणताही पंडित ही परिस्थितीत स्वीकारार्ह समजणार नाही.

धर्मश्रद्ध लोक ज्यावेळी धर्म ही पारलौकिक बाब आहे, असे म्हणतात, त्या वेळी त्या वाक्याचा आशय अगदी निराळा असतो. इहलोकात काय पुण्य मानावे, काय पाप मानावे , काय धर्म्य मानावे, समर्थनीय मानावे यावर विचार करण्याचा अधिकार इहालौकीक जीवन जगणाऱ्यांचा नसून याबाबत परलोकातून आलेले निर्णय हेच फक्त स्वीकारार्ह आहेत, असे धर्मिकाना म्हणायचे असते. सगळ्या समाजजीवनालाच धर्माची मान्यता असते. न्याय, पाप, पुण्य, धर्माने आखून दिलेले असते. व्याजी दिलेल्या रकमेची एक वर्षात व्याजासकट दीडपट होणे रास्त आहे, असे धर्माचे म्हणणे असते. म्हणून तर मानू व्याजाचे दरसुद्धा ठरवून देतो. हिंदू समाजातील सगळी जातीव्यवस्था धर्माच्या मान्यतेने उभी आहे. हिंदू धर्म काय किंवा मुसलमान धर्म काय, तत्वतः कुठलाच धर्म पारलौकीक नसतो. परलोकाच्या नावे चालणारा इहलोकाचा सार्वजनिक व्यवहार ही धर्मच मुख्य कक्षा असते. समाजजीवनाच्या सार्वजनिक कक्षेतून धर्म बाजूला सारणे आणि तो केवळ पारलौकीक बाबींसाठी मर्यादित ठेवणे, हा मी Secularismचा मुख्य अर्थ मानतो, ते यासाठीच.

‘पारलौकिक बाब’ हा वाटतो तितका साधा नाही. बोराच्या आळीत तक्षक लपला असावा, त्याप्रमाणे या एका सूत्रात धर्माचा सारा विषारीपणा लपलेला असतो. मेल्यानंतर जीवात्म्याचे व्हायचे, किंवा काय व्हावे, हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही. कारण मृत्युनंतर जीव देहाबंधानातून मुक्त होतो, इहलोकी केलेल्या पाप-पुण्यातून नाही. मृत्युनंतर परलोकी जीवाला जे फळ मिळायचे ते इह्लोकीच्या कर्मानुसार असते. म्हणून इहलोकात कर्तव्यविधि काय, अकर्तव्यनिषेध काय हे धर्म सांगून टाकतो. जानवे तुटले असताना जेवणारा ब्राह्मण पाप करतो. हे त्याचे पाप त्याला मृत्युनंतर फेडावे लागते. धर्म ही केवळ पारलौकीक बाब आहे, या वाक्याचा खरा अर्थ समाजाच्या धारणेची मूल्ये देण्याचा अधिकारसुद्धा धर्माचा नाही, हा आहे. कारण व्यभिचारी पती सहन करावा कि सोडावा, याचा निर्णय जोवर धर्म देणार असेल तोवर तो धर्म मूल्यांच्या दडपणाने स्त्रियांची गुलामी चालू ठेवणार आहे. समाजातील सर्वाजनिक जीवन तर सोडाच, पण व्यक्तीचे मानसिक जीवन हेही इहालौकीक असते. देशद्रोह करणारा पती गोळी घालून ठार मारणे म्हणजे पाप , या पतीहत्येच्या पापामुळे अनंतकाळ रौरव नरकात यातना भोगाव्या लागतील, अशी समजूत समाजामध्ये जर बळकट राहिली, तर मग राष्ट्रावाद्सुद्धा धोक्यात येईल.

वरील उदाहरणे एकांतिक आहेत, अतिरेकी आहेत, अपवादात्मक आहेत हे मीच मान्य करून टाकतो. पण ती उदाहरणे फक्त मुद्दा समजण्यापुरती आहेत. धर्माने सरंजामशाही च्या कळत स्वीकारलेली, पुरस्कारलेली समाजरचना आणि जीवनमूल्ये या दोन्हींचाही ठसा समाजाच्या मनावरून शक्य तितक्या लवकर पुसून काढावा ही Secularismची प्रक्रिया आहे. म्हणून मी या शब्दाची व्याख्या धर्म पारलौकिक बाबींपुरता मर्यादित करणे अशी करतो आणि ज्यावेळी मी पारलौकी हा शब्द वापरतो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर फक्त काही अध्यात्मिक श्रद्धा इतकेच आहे. Secularism ची ही व्याख्या म्हणजे सरळसरळ धर्माविरुद्ध बंड आहे हे मी मान्य करतो. कारण Secularism ही कल्पनाच मुळी धर्माविरुद्धच्या बंडातून क्रमाने विकसित होत आलेली आहे.

आजच्या राजकारणात नेहेमी Secularism चा विचार अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणाच्या संदर्भात होतो, हीच मुळात पहिली चूक आहे, Secular राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकाच्या जीविताचे व हिताचे संरक्षण होत असेल तर ती एक अनुषंगिक बाब आहे। Secularism अल्पसंख्याकांच्या हितासाठी नसतो, तो नेहेमीच बहुसंख्येच्या हितासाठी असतो; ही गोष्टच विसरून जाऊन आपण Secularism चा विचार करू लागलो आहोत.

- Dnyaneshwar Patil,

COEP History Club