UPCOMING EVENTS


Upcoming Events (Lectures on):

  • HISTORY WEEK FEBRUARY 2012


  • History Week 2012
  •   lecturers:30th Jan-श्री.कुमार केतकर_Pandit Neharu, 31st Jan श्री.सुरेश द्वादशीवार_Mahatma Gandhi,
  • 1st Feb श्री.राजू परुळेकर_Dr. Babasaheb Ambedkar,
  • 2nd Feb_श्री.अजित अभ्यंकर_Marx , 3rd Feb_श्री.विश्वंभर चौधरी _RSS

Wednesday, September 1, 2010

कविराज भूषण

बाळ कोल्हटकर यांनी केलेल्या कविराज भूषणाच्या कवितेचा अनुवाद आज मी आपल्यासाठी देतो आहे.
बाल कोल्हटकर यांच्या नाटकामधील हि अनुवादित कविता आहे. या कवितेमध्ये रायगडावर असणाऱ्या वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेली इत्यादि तसेच शेवटी गंगासागर जलाशय हा आकाशातील गंगेहुनही कसा श्रेष्ठ आहे याचे चित्रण केले आहे. शेवटचा भाग हा मूळ पुस्तकात नाही.
सध्या माझाकडे भूषणाची मूळ कविता नसलाकारणाने ती मी इथे देऊ शकत नाही. पण कोल्हटकर यांनी केलेला अनुवाद हाही तितकाच सुंदर आहे.

जटा बांधुनी नटली धरणी
विशाल पलाश वृक्षांचा |
लटा तरुंना बिलगुनी डुलती ,
नाच चालतो छायेचा ||
कुठे बांधल्या जलाशयावर
जिना शोभतो दगडांचा |
विहार चाले त्या पाण्यावर
चक्रवाक, कधी हंसांचा ||
कोठे चंदन,कुठे चमेली
गंध दरवळे चाफ्याच्या |
लवंगवेली कुठे वेलची
लक्ष न पुरतो संख्येचा ||
चंद्रमुखीच्या सवेच जेव्हा
चंद्र उगवतो पूर्वेचा |
असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला ,
आजच उदरी गंगेच्या ||
वरती गंगा खाली सागर
वरती तारे येथे कमले |
वरचे तारे खाली येती
प्रतिबिंबांना रूपे पडती ||
म्हणून म्हणतो भूषण हे कि
आकाशाच्या गंगेहून हि
गंगासागर भाग्याचा!!

--ज्ञानेश्वर पाटील

1 comment: